

प्रथमेश राऊत यांची जिल्हाप्रमुखपदी निवड
विरार (बातमीदार)ः शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वसई विरार जिल्हाप्रमुखपदी प्रथमेश राऊत यांनी निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा प्रमुख प्रवीण महाप्रलकर यांनी राजीनामा दिला होता. जिल्हाप्रमुखपदाच्या शर्यतीत राजाराम बाबर, उदय जाधव, प्रथमेश राऊत, काका मोठे, संजय गुरव यांची नावे शिवसेनेच्या बैठकीत आली होती. त्यानंतर उदय जाधव, प्रथमेश राऊत यांच्यात लढाई होती. परंतु, शेवटच्या क्षणी उदय जाधव यांनी माघार घेतल्याने प्रथमेश राऊत यांच्या नाव जाहीर करण्यात आले. यापूर्वी वसई, नालासोपरामधून जिल्हाप्रमुखपद देण्यात आले होते. त्यात धर्माजी पाटील, विवेक पंडित, शिरीष चव्हाण, पंकज देशमुख, प्रवीण महाप्रलकर यांनी जिल्हाप्रमुख पद भूषवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.