शंकरपाडा शाळेचा लोकसहभागातून कायापालट

शंकरपाडा शाळेचा लोकसहभागातून कायापालट
Published on

शंकरपाडा शाळेचा लोकसहभागातून कायापालट
कासा, ता. ३० (बातमीदार)ः अस्वाली गावातील शंकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेने लोकसहभागाच्या बळावर शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. जीर्ण अवस्थेतील शाळेपासून अत्याधुनिक ‘स्मार्ट’ शैक्षणिक संकुलापर्यंतचा हा प्रवास कौतुकाचा विषय ठरत आहे.
ग्रामस्थ, शिक्षक, पालकांनी एकत्र येत आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळेच्या उभारणीचा संकल्प केला. या सामूहिक प्रयत्नांना डॉ. प्रतिमा कोडकणी, संदीप परीख व परिवार, आनंदा केअर तसेच दुहिता फाउंडेशन यांसारख्या सामाजिक संस्थांची मोलाची साथ लाभली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही सुसज्ज शाळा उभी राहिली. सध्या शाळेत ‘स्मार्ट क्लासरूम’ संकल्पना प्रभावीपणे राबवली जात असून, प्रत्येक वर्गात संगणक प्रणाली बसवून विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, अनेक मराठी शाळा बंद पडत असताना शंकरपाडा शाळेने पहिली ते दहावीपर्यंत विस्तार साधत उलट आदर्श निर्माण केला आहे. सध्या शाळेत २७४ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com