

उल्हासनगर, ता. ३० (बातमीदार) : महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सादर केलेल्या ९९७.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही पालिकेत गटनेते, स्थायी समिती सदस्य व नगरसेवकांच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी समजावून सांगितल्या.
महापौर, उपमहापौरांसह अनेक नगरसेवक नवखे असल्याने अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी सोमवारपर्यंत महासभा तहकूब करण्यात आली होती. त्यानुसार शनिवार आणि रविवारी विशेष बैठका घेण्यात आल्या. रविवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मॅरेथॉन बैठक झाली. अर्थसंकल्पातील तरतुदी अधिकाऱ्यांकडून समजावून घेण्यात आल्या.
या बैठकीला उपमहापौर अमर लुंड, शिवसेना गटनेते अरुण आशान, भाजप गटनेते राजेश वधारिया, काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे, वंचितच्या गटनेत्या सुरेखा सोनवणे, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, लाल पंजाबी यांच्यासह कमलेश निकम, मनोज लासी उपस्थित होते.
प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण, उपायुक्त डॉ. दीपाली चौगले, अनंत जवादवार, स्नेहा करपे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक विलास नागदिवे, शहर अभियंता हनुमंत खरात यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीमुळे नगरसेवकांना अर्थसंकल्पाचा सखोल अभ्यास करता आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.