सुक्या मासळीला मोठी मागणी... दर वाढले

सुक्या मासळीला मोठी मागणी... दर वाढले
Published on

सुकी मासळी महागली
नवी मुंबईत भाव २० टक्क्यांनी वधारले
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई परिसरात सध्या सुक्या मासळीला मोठी मागणी वाढताना दिसत आहे. वाशी, नेरूळ, घणसोली, दिघा आणि ऐरोली परिसरातील बाजारांमध्ये सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भावांमध्ये सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खवय्ये सुक्या मासळीवर ताव मारतात. याशिवाय अगोटीसाठी मोठ्या प्रमाणात सुकी मासळी खरेदी केली जाते. हिवाळ्यात सुकवलेल्या सुक्या मच्छीचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांचा कल याकडे अधिक आहे. अनेक खवय्ये पनवेल, मरोळ, तळोजा, कोन आणि वसई येथील होलसेल बाजारातून मासळी खरेदी करताना दिसतात. याशिवाय शहरातील बाजारात वाशी, दिवाळे, पनवेल, ठाणे आणि वसई परिसरातून येणारे मच्छीमार मोठ्या प्रमाणात सुकी मच्छी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मांदेली, बोंबील, सुकट, जवळा, वाकटी, पाखट, बांगडा यांसारख्या विविध प्रकारच्या मच्छीला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
वाढत्या महागाईचा फटका यंदा मच्छी खरेदीदारांना बसत आहे. मागील वर्षी ४०० ते ५०० रुपयांत मिळणारा बोंबील यंदा ८०० ते ९०० रुपये शेकडा भावाने विकला जात आहे. इतर सुक्या मच्छीच्या किमतीतही २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मच्छीमारांच्या मते, समुद्रातील मासळीचे कमी प्रमाण, वाढलेले डिझेल भाव, मजुरी खर्च आणि इतर खर्चांमुळे सुक्या मच्छीच्या किमतीत वाढ झाली आहे. तरीही घरात साठवणूक करून वर्षभर वापरता येत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.

सध्याचे भाव
जवळा - ४०० रु. किलो
बोंबील - ९०० रु. किलो
करदी - ७०० रु. किलो
सोडे - २००० रु. किलो
मांदेली - ३५० रु. किलो
बांगडा - १ नग ५० रु.
सुरमई - ४०० रु. नग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com