मुस्लिम समाजाला मुख्यप्रवाहात आणावे

मुस्लिम समाजाला मुख्यप्रवाहात आणावे
Published on

मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणावे
एनजीओ फोरमचे जाकीर शिकलगार यांचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रमासह राज्य आणि केंद्र सरकारच्या शासकीय योजनांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देऊन या योजना तळागाळातील गरीब आणि गरजू मुस्लिमांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत; त्यात नक्कीच यश येईल, असा ठाम विश्वास महा मायनॉरिटीज एनजीओ फोरमचे अध्यक्ष झाकीर शिकलगार यांनी मुंबईतील हज हाउस येथे झालेल्या परिषदेत व्यक्त केला.

या वेळी व्यासपीठावर आमदार अबू आसिम आझमी, काँग्रेस नेते निजामुद्दीन राईन, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यासह आयोगाचे सदस्य तसेच नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, कार्याध्यक्ष डॉ. अस्लम बारी, अब्दुल शेख, इरफान सय्यद, मोहसीन शेख, परवेज महाडिक आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम समाजाची संख्या १२ ते १३ टक्के आहे. मात्र, अजूनही हा समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विकासाचा रोडमॅप तयार केला पाहिजे, असेही झाकीर शिकलगार यांनी नमूद केले.
महा अल्पसंख्याक एनजीओ फोरमच्या वतीने हज हाउस येथे राज्यस्तरीय एनजीओ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्यभरातील एनजीओ चालवणारे मुस्लिम युवा-युवती तसेच समाजातील अग्रगण्य डॉक्टर, कॉलेज प्राध्यापक, इंजिनिअर, अर्थविषयक अभ्यासक आणि उद्योगपती सहभागी झाले होते. राज्यातील सर्वच मुस्लिम खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि व्यावसायिक यांनी बळ दिल्यास मुस्लिम समाज शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सबळ होईल, असा विश्वासही या परिषदेत व्यक्त करण्यात आला. अल्पसंख्याक विकास विभाग संलग्न सर्व विभागात प्रत्येक निर्धारित मंजूर पदावर सर्व अधिकारी, कर्मचारी स्वतंत्र अधीभाराचे तातडीने नेमणूक करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com