

भोंदू अशोक खरातविरोधात महाराष्ट्र अंनिसची जनजागृती
प्रभादेवी, ता. ३० (बातमीदार) ः भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), मुंबई जिल्ह्याच्या वतीने अंधश्रद्धाविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. विवेक जागर संस्थेअंतर्गत ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.
दादर स्थानकाबाहेर आयोजित या मोहिमेत भोंदूगिरीविरोधात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. पोस्टर, गीत आणि संवादाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला. या वेळी अंनिसचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, रुपेश शोभा, राजेंद्र पंडित यांच्यासह दादर, दहिसर, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर आदी शाखांचे कार्यकर्ते, इतर जिल्ह्यांतील कार्यकर्ते, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुंबई विभागीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आनंद पटवर्धन तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे शरद डचिोलकर उपस्थित होते.
या जनजागृती मोहिमेला महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत भोंदू अशोक खरात याच्यासह त्याला साथ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अंधश्रद्धेचा विळखा ओळखून राज्यातील भोंदूबाबा, बुवा, तांत्रिक आदींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. जादूटोणाविरोधी कायद्यामुळे अशा प्रकारच्या भोंदूगिरीवर नियंत्रण येत असल्याचे नंदकिशोर तळाशीलकर यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवावी आणि प्रचार समिती पुन्हा कार्यरत करावी, असे आवाहनही सरकारला करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.