नेरूळगावचा मार्गदर्शक आणि म्हात्रे कुटुंबाचा आधारवड हरपला

नेरूळगावचा मार्गदर्शक आणि म्हात्रे कुटुंबाचा आधारवड हरपला
Published on

ज्येष्ठ समाजसेवक अनंत म्हात्रे यांचे निधन
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) : नेरूळ गावातील ज्येष्ठ समाजसेवक अनंत म्हात्रे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी रविवारी (ता. २९) निधन झाले. ऐन यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या निधनाने नेरूळ गावावर शोककळा पसरली असून, गावाने मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अनंत म्हात्रे हे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व होते. भजन, कीर्तन, सप्ताहाचे नियोजन यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. तसेच रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री आणि नवरात्रीसारख्या धार्मिक उत्सवांमध्ये त्यांनी दिलेले मार्गदर्शन गावासाठी मोलाचे ठरले. त्यांच्या पश्चात पत्नी आनंदी म्हात्रे, मुलगी अलका पाटील, कुंदा भगत, मुलगा सोमनाथ म्हात्रे, भावंडे भाऊ म्हात्रे, हसुराम म्हात्रे, बाबुराव म्हात्रे, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com