

नेरूळमध्ये रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक
प्रशासनाचे दुर्लक्ष
नेरूळ, ता.३० (बातमीदार) : नेरुळमधील वंडर्स पार्कसमोर बेकायदा रिक्षा स्टँड तयार झाले असून रिक्षाचालक शेअर रिक्षाप्रमाणे व्यवसाय करतात. यामधून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याकडे आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून अशा रिक्षाचालकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
वंडर्स पार्क नेरुळ तसेच सीवूड्स रेल्वे स्थानकापासून लांब अंतरावर असल्याने रेल्वेने ये-जा करणारे नागरिक स्थानकापासून रिक्षाच्या प्रवासाला पसंती देतात. दोन्ही रेल्वे स्थानकांपासून मीटरवर २६रुपयांत रिक्षा उपलब्ध होते. मात्र वंडर्स पार्कमधून रेल्वे स्थानकांकडे जाताना मीटर रिक्षाचा पर्याय नसून बेकायदेशीररीत्या शेअर रिक्षा सुरू आहेत. हे रिक्षाचालक प्रति प्रवासी २० रुपये आकारत असून यामुळे एका कुटुंबातील एकाहून अधिक प्रवास करणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट होत आहे.
या रिक्षांमध्ये मागे तीन तसेच रिक्षाचालकाच्या शेजारी दोन अशा पाच प्रवाशांची वाहतूक केली जाते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.