नालासोपाऱ्यात निर्घृणपणे हत्या करून फेकलेला पुरुषाचा मृतदेह मिळाला

नालासोपाऱ्यात निर्घृणपणे हत्या करून फेकलेला पुरुषाचा मृतदेह मिळाला
Published on

नालासोपाऱ्यातील पुरुषाचा मृतदेह सापडला

नालासोपारा, ता. ३० (बातमीदार) : नालासोपाऱ्यात अनोळखी पुरुषाचा गळा कापून धारदार हत्याराने वार करत, गोणीत भरून फेकलेला मृतदेह सोमवारी (ता. ३०) सापडला. नालासोपारा पूर्व पेल्हार हद्दीतील जाबरपाडा परिसरात सकाळी साडेनऊ वाजता ही घटना उघड झाली. याबाबत पेल्हार पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिस तपास करीत आहेत.
नालासोपारा पूर्व पेल्हार जाबरपाडा येथील रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत एक गोणी स्थानिक नागरिकांना आढळून आली. पेल्हारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कांबळे यांना याची माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन त्यांनी पंचनामा केला, शिर नसलेल्या मृतदेहावर धारदार हत्त्याराने वार केलेले आढळून आले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन, तो शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला. याबाबत अज्ञात आरोपीविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com