बालकांना कुपोषणाच्या दाढेतून काढण्याचे प्रयत्न

बालकांना कुपोषणाच्या दाढेतून काढण्याचे प्रयत्न
Published on

बालकांना कुपोषणाच्या दाढेतून काढण्याचे प्रयत्न
टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांची माहिती

पालघर, ता. ३० ः पालघर जिल्ह्यात बालकांतील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु माता मृत्यूचे प्रमाण मात्र वाढल्याची चिंता राज्य कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी पालघरमध्ये व्यक्त केली आहे. माता मृत्यूचे प्रमाण सरकारी आरोग्य संस्थांऐवजी खासगी रुग्णालयात जास्त झाले आहे, अशी माहिती देत ते रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला दिल्या. नुकताच सावंत यांनी जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
तृणधान्यापासून बालकांना आवडणारे खाद्यपदार्थ तयार करून त्यांना पोषण म्हणून दिल्यास कुपोषणाला आळा बसेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. हैदराबाद येथील मिलेट रिसर्च सेंटरची मदत आम्ही घेत आहोत, असेही सावंत म्हणाले. आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्यासाठी आम्ही करत आहोत, असे सावंत यांनी म्हटले. पावसाळ्यात कुपोषण आणि मृत्यूंचा वाढता आकडा लक्षात घेता आतापासून तयारीला लागा, अशा सूचना डॉ. सावंत यांनी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाला दिल्या आहेत.

प्रसूती पश्चात उपायोजना आवश्यक
सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालय कासा, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव, मनोर येथे सुरू असलेले ट्रॉमा केअर सेंटर अशा विविध आरोग्य केंद्रांना भेट दिली. तेथील समस्या जाणून घेतल्या. माता मृत्यू रोखण्यासाठी प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात उपायोजना करणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी म्हटले. पालघर विधानसभेचे आमदार राजेद्र गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा बालविकास अधिकारी हुंडेकर आणि सर्व अधिकारी या वेळी उपस्थित होते.

उपाययोजना करण्याची गरज
पावसाळा येणार असल्याने डायरीया, कावीळ असे रोग बळावतात. त्यासाठी उपाययोजना करा. जी गावे पावसाळ्यात पूरस्थितीमुळे संपर्कहीन होतात, त्या ठिकाणीदेखील आरोग्य यंत्रणा कशी पोहोचेल, याबाबत सावंत यांनी माहिती घेतली. गावातील गरोदर महिलांना जवळच्या आरोग्य केंद्रात ठेवण्याबाबतच्या सूचना विभागाला केल्या. प्रसूतीदरम्यान माता मृत्यू अधिक होतात, यामुळे अशावेळी तातडीने रक्तपुरवठा करण्यासाठी त्या गरोदर मातांचा रक्तगट तपासून त्याची माहिती आधीच घेऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने कशा करता येतील याबाबत त्यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com