

लग्नाचे भूलथापा देत महिलेवर अत्याचार
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका तरुणाने पुणे येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. प्रसाद भास्कर खळे (३३) असे आरोपीचे नाव असून, कोपरखैरणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेतील पीडित महिला (३७) पुणे येथे वास्तव्यास असून, आरोपी खळे कोपरखैरणे येथे राहण्यास आहे. वर्षभरापूर्वी या दोघांची ओळख झाली. यानंतर दोघेही गेल्या वर्षभरापासून कोपरखैरणे येथे लिव्ह-इनमध्ये राहत होते. या कालावधीत आरोपीने पीडित महिलेला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेसोबत लग्न करण्यास नकारही दिला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पीडितेस आरोपी प्रसाद खळे याच्या घरी ठेवलेले तिचे सामानही परत देण्यास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी प्रसाद भास्कर खळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.