धारावीत रंगला कबड्डीचा थरार

धारावीत रंगला कबड्डीचा थरार
Published on

धारावीत रंगला कबड्डीचा थरार
स्थानिक खेळाडूंचा दमदार प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः धारावी प्रीमियर लीग-३ च्या यशस्वी आयोजनानंतर नवभारत मेगा डेव्हलपर्सच्या (एनएमडीपीएल) वतीने धारावीत आयोजित करण्यात आलेल्या ‘कबड्डी लीग’लादेखील स्थानिक खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेदरम्यान धारावीकरांना ‘कबड्डीचा थरार’ अनुभवता आला.
कबड्डी लीगच्या पहिल्याच हंगामात धारावीतील एकूण १० संघ (८ पुरुष संघ, २ महिला संघ) स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण ९६ पुरुष कबड्डीपटू आणि २४ महिला कबड्डीपटूंनी आपल्या क्रीडा नैपुण्यांचे प्रदर्शन करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
पुरुष गटातील अंतिम सामन्यात जेपीआर संघाने बाजी मारली, तर शिवाजी स्पोर्ट्स क्लबला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महिला गटात शताब्दी स्पोर्ट्स क्लबने रंगतदार सामन्यात विजयश्री खेचून आणली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूंच्या सहभागाने धारावीतील कबड्डीच्या गुणवत्तेचे अनोखे प्रदर्शन या स्पर्धेत पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, महिलांच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना समनसमान गुण मिळाल्याने ‘एक्स्ट्रा टाइम’ मधील खेळातून सामन्याचा विजेता ठरविण्यात आला.
अशा आयोजनांमधून स्थानिक युवकांच्या आत्मविश्वासात भर पडते. आपलं विश्व घडविण्याची ताकद आपल्याच मनगटात आहे, ही त्यांना होणारी जाणीव आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. हेच आमचे उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया एनएमडीपीएलच्या प्रवक्त्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com