

मुंबईत रंगला ‘अनहद’ सोहळा
नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
मुंबई, ता. ३० : भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनंत आणि आध्यात्मिक परंपरेचा अनुभव देणारा ‘अनहद’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. २७ आणि २८ मार्चला ‘एनसीपीए’ नरिमन पॉइंट येथे झालेल्या या कार्यक्रमात बहाउद्दीन डागर, उल्हास कशाळकर, परवीन सुलताना, एन. राजम यांच्यासारख्या नामवंत कलाकारांनी सादरीकरण केले. एसबीआय पेमेंट्स या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते.
हा कार्यक्रम स्पीक मॅके (सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिक्ल म्युझिक ॲण्ड कल्चर एम्गस्ट युथ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विद्यार्थी, संगीतप्रेमी आणि सांस्कृतिक रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून रश्मी मलिक आणि नेहा बंडोपाध्याय यांनी काम पाहिले. पिल्लाई विद्यापीठ, रायन इंटरनॅशनल स्कूल, न्यू बॉम्बे सिटी स्कूल येथील विद्यार्थी स्वयंसेवकांनीही मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल स्पीक मॅकेतर्फे एसबीआय पेमेंट्सचे आभार व्यक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.