घंटाळी मैदानात भव्य हनुमान महायज्ञाची सुरुवात

घंटाळी मैदानात भव्य हनुमान महायज्ञाची सुरुवात
Published on

हनुमान महायज्ञाची सुरुवात

ठाणे (बातमीदार) : श्रीविद्या साधना सेवा संस्था आणि श्री घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील घंटाळी मैदानात पाचदिवसीय भव्य श्री हनुमान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत म्हणजेच २९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉ. सुधीर रानडे आणि मनोज जोशी यांनी दिली. या महायज्ञादरम्यान दररोज विविध धार्मिक विधी, पूजन आणि सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मकरसंक्रांतीपासून सुमारे तीन हजार भाविकांनी दररोज ११ वेळा हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्प केला असून, एकूण ११ लाख जपांची पूर्णाहुती या महायज्ञात होणार आहे. यज्ञस्थळी १०८ किलो तेलाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यात येणार असून, हनुमंताच्या १०८ प्रतिमांचे दररोज पूजन केले जाणार आहे. तसेच ३१ मार्चला सायंकाळी ६ वाजता सामूहिक सुंदरकांड पाठाचे आयोजन करण्यात आले असून, यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com