घोडबंदर भागात तीव्र पाणीटंचाई

घोडबंदर भागात तीव्र पाणीटंचाई
Published on

घोडबंदर भागात तीव्र पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली असून, घोडबंदर परिसरातील रहिवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. येथील बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २७ लाख असून, शहरासाठी दररोज ६१६ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात सुमारे ५८५ दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागांमध्ये तुटवडा जाणवत आहे. महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. असे असतानाही गेल्या काही दिवसांत पाणीपुरवठा कमी झाल्याने घोडबंदर भागातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अनेक सोसायट्यांना दरमहा पाच ते सात लाख रुपयांपर्यंत टँकरचा खर्च करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या समस्येविरोधात संतप्त रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच महापालिकेला जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पाणीटंचाईचा मुद्दा महापालिकेच्या विशेष महासभेतही नगरसेवकांनी उपस्थित करत घोडबंदर भागातील अडचणी मांडल्या.
दरम्यान, पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असली तरी योग्य नियोजन करून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com