पनवेल महापालिकेचा ४,६५३ कोटींचा विकासवेधी अर्थसंकल्प;

पनवेल महापालिकेचा ४,६५३ कोटींचा विकासवेधी अर्थसंकल्प;
Published on

पनवेल महापालिकेचा विकासवेधी अर्थसंकल्प
पनवेल, ता. ३० (बातमीदार) ः पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सोमवारी (ता. ३०) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी चार हजार ६५३ कोटी १० लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला. वाढत्या नागरीकरणाचा वेग आणि भविष्यातील गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकात १० लाख रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य कणा मालमत्ता कर ३२.५० टक्के आणि मागील वर्षातील आरंभीची शिल्लक २९.२७ टक्के हा आहे. याव्यतिरिक्त विकास शुल्क ११.०७ टक्के, जीएसटी अनुदान ९.८४ टक्के आणि व्याजापोटी मिळणारे उत्पन्न ५.३७ टक्के यामुळे तिजोरीला बळकटी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com