

जुन्या वादातून गोळीबार केल्याने अटक
आरोपीकडून देशी बनावट पिस्तूल जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळी झाडल्याची घटना नुकतीच वागळे इस्टेट परिसरात घडली. गोळीबार करणाऱ्या आरोपीला नौपाडा पोलिसांनी ४८ तासांत ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच त्याला येत्या २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीही सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.
मुंबई-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर शुक्रवारी (ता. २७) ही घटना घडली. तक्रारदार इंजमाम अमीरुद्दीन सिद्धिकी (२६) हे आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले असता, आरोपी जबीउल्ला शफीकुररहमान खान (३९) याने त्यांच्यावर दोन राउंड गोळीबार केला. दोन महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्याचाच राग मनात धरून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीला बंदुकीचा धाक दाखवत दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपीने मोबाईल बंद करून फरार होण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी माहितीच्या आधारे वागळे इस्टेट परिसरात सापळा रचून अटक केली. आरोपीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र कायदा इत्यादी गंभीर गुन्ह्यांची यापूर्वीही नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.