

चोरी करणाऱ्या त्रिकूटाला अटक
गुन्हे शाखेकडून ४१ गुन्ह्यांतील ५८ दुचाकी जप्त
भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) : भिवंडीसह संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहनचोरीच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनचोरी करणाऱ्या त्रिकूटाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्या ४१ गुन्ह्यांतील चोरी केलेल्या ५८ दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरी केलेली सर्व वाहने आरोपींनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडीत अनेक वाहनचोरीच्या घटनांचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने केला जात होता. गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार साबीर शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गणेश मोरे (२१), छोटू सुलतान अली शेख (१९) सुनील ऊर्फ बाळा शंकर राठोड (२०) या तिघांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून १० लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५८ दुचाकी जप्त करीत ४१ गुन्हे उघडकीस आणले. छोटू सुलतान अली हा दुचाकी दुरुस्ती गॅरेजमध्ये काम करीत असून, त्याने आपल्या कौशल्याने अनेक वाहने चोरी केली. त्यानंतर आर्थिक फायद्यासाठी गणेश व सुनील यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या चोरीच्या दुचाकींची विक्री केली होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.