उन्हामुळे कुभांरवाड्यात लगबग

उन्हामुळे कुभांरवाड्यात लगबग
Published on

उन्हामुळे कुंभारवाड्यात लगबग
विक्रमगडमधील थंड पाण्यासाठी माठांना मागणी
विक्रमगड, ता. ३१ (बातमीदार)ः पाण्याचा नैसर्गिक गारवा, आरोग्यदायी गुणधर्मामुळे माठांना मोठी मागणी आहे. त्यामुळे विक्रमगडच्या ग्रामीण भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच पारंपरिक परराज्यातील माठविक्रेते दाखल झाले आहेत.
विक्रमगडच्या कुंभारवाड्यात सध्या माठ तयार करण्याची लगबग सुरू आहे. डिसेंबरपासूनच माठ बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. गुजरातमधून विशेष माती आणून त्यावर प्रक्रिया करून विविध आकार, आकर्षक डिझाइनचे माठ तयार केले जातात. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत असून, आजही अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने माठांच्या विक्रीला वेग आला आहे. १५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत किमतींमध्ये माठ उपलब्ध आहेत. काही माठांवर आकर्षक नक्षीकाम केलेले असून, तर काहींमध्ये नळ बसवण्यात आलेले आहेत. बाजारात राजस्थानमधील विक्रेतेही माठ विक्रीसाठी फिरताना दिसत आहेत. अनेकदा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने माठांचा तुटवडा जाणवत आहे.
-------------------------------
परवडणारा पर्याय
- कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात माठ तयार होत होते. मात्र, भट्टीसाठी जागेअभावी उत्पादनात काही प्रमाणात घट झाल्याचे व्यावसायिक सांगतात. वाढत्या उष्णतेमुळे माठांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.
- फ्रीजमधील पाण्याच्या तुलनेत माठातील पाणी अधिक गोड, शरीरासाठी हितकारक आहे. तसेच फ्रीजच्या तुलनेत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा पर्याय ठरतो. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
----------------------------
वाढत्या महागाईने माठांच्या किमतीत वाढ झाली आहे. माती, रंग, इतर साहित्य महाग झाले आहे. तरीदेखील फ्रीजच्या काळात माठांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. माठ विक्रीसाठी गुजरातवरून येतो.
- आलम भाई, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com