

पोकलन मशीन
खड्ड्यात कलंडले
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : कल्याण-शीळ रोडवरील टाटा पॉवर परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना सोमवारी (ता.३०) एक थरारक घटना घडली. खोदकाम करत असताना एक अजस्त्र पोकलन मशीन अचानक खड्ड्यात कलंडले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठा अनर्थ टळला आहे.
टाटा पॉवर परिसरात सध्या मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला खोल चर खोदले जात आहेत. सोमवारी (ता. ३०) काम सुरू असताना, जमिनीचा अंदाज न आल्याने किंवा माती खचल्यामुळे पोकलन मशीनचा तोल गेला आणि ते थेट खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात कलंडले. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी परिसरात कामगारांची वर्दळ होती. मशीन खड्ड्यात पडताना मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. मात्र, ऑपरेटरने प्रसंगावधान राखल्याने आणि मशीन दुसऱ्या बाजूला पूर्णपणे न उलटल्याने मोठा अपघात टळला. या घटनेमुळे कल्याण-शीळ रोडवर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. खड्ड्यात अडकलेले पोकलन मशीन बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या मोठ्या वाहनाची मदत घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.