वांगनपाडा ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

वांगनपाडा ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात
Published on

वांगनपाडा ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात
विक्रमगड, ता.३१(बातमीदार)ः विक्रमगड तालुक्यातील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून सामूहिक निर्णय घेत पेसा निधीचा प्रभावी, पारदर्शक वापर करण्यात येत आहे. त्यामुळे वांगनपाडा येथे दीर्घकाळापासून असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे.
उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार केला. वयम चळवळीच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामपंचायत अधिकारी योगेश पाटील आणि सरपंच स्वातीताई सहारे यांच्या सहकार्याने ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. २०२३-२४ मधील वित्त आयोग निधी आणि पेसा निधीचा योग्य वापर करत गावात कूपनलिका खोदण्यात आली. त्यामुळे मुबलक पाणी लागल्याने वांगनपाडा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com