शीळ येथे अखंड हरिनाम सोहळा

शीळ येथे अखंड हरिनाम सोहळा
Published on

शिळ येथे अखंड हरिनाम सोहळा

विक्रमगड, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील शिळ येथील हनुमान मंदिरात यंदा अखंड हरिनाम सोहळा व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सोहळाचे हे १२वे वर्ष असून, हनुमान जन्मोत्सवाचे ३७वे वर्ष आहे. यामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन व हरिनाम सप्ताह हे असेल. कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी (ता. ३१) झाली असून, ह.भ.प. अभिमन्यू महाराज म्हात्रे (बदलापूर) यांनी कीर्तनाद्वारे भक्तांना त्यांच्या कीर्तनातून आध्यात्मिक संदेश दिला. यानंतर बुधवारी (ता. १) ह.भ.प. प्रेमानंद महाराज शास्त्री (बीड) यांचे कीर्तन होणार आहे. ते भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असून, त्यांच्या प्रभावी कीर्तनशैलीमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभते. या कीर्तनाचे संयोजन डॉ. ह.भ.प. सोपान गजानन सांबरे (झडपोली) यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी (ता. २) सकाळी ०९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून, पुन्हा एकदा ह.भ.प. प्रेमानंद महाराज शास्त्री भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन जितेश दीपक वेखंडे आणि रोहित शंकर सांबरे यांनी केले आहे.
तसेच गुरुवारी रात्री पारंपरिक बोहोडा नृत्याचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com