गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करा

गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करा
Published on

गॅसटंचाईवरून राष्ट्रवादी आक्रमक
ग्राहकांना सहकार्य करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) वतीने वल्ली राजन यांनी कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. गॅस एजन्सींनी ग्राहकांना पूर्ण सहकार्य करावे आणि कृत्रिम टंचाई थांबवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

नागरिकांकडून गॅस वितरणाबाबत अनेक गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत. सिलिंडर बुकिंग करूनही वेळेत वितरण होत नाही. होम डिलिव्हरीसाठी शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतले जात आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक गॅसची टंचाई निर्माण केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्र्वादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

वल्ली राजन यांनी सर्व गॅस एजन्सी व्यवस्थापकांना पत्राद्वारे आवाहन केले असून, प्रशासनाकडे बुकिंगनुसार ठराविक वेळेतच गॅसचा पुरवठा व्हावा, जादा पैसे उकळणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करावी, सर्वसामान्य ग्राहकांना वितरणात प्राधान्य मिळावे, अशा मागण्या केल्या आहेत. तसेच गॅस एजन्सींनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. जर ग्राहकांची लूट थांबली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करून पाठपुरावा केला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) वल्ली राजन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com