

बालक-पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालाड, ता. ३१ (बातमीदार) : कांदिवली (पश्चिम) येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात शनिवारी (ता. २८) भव्य बालक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत कार्यक्रमात रंगत आणली.
येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच पालकांच्या सक्रिय सहभागातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प विद्यालयाने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील सादरीकरण, प्रवसन तसेच पीपीटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प सादर करत आपली कौशल्ये आत्मविश्वासाने मांडली. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या या गुणदर्शनाचा मनापासून आनंद घेतला.
या वेळी विद्यालयाच्या प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या संस्था व मान्यवरांचा पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच ‘मिशन ग्रीन’ संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पर्जन्य जल संधारण व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन प्रणाली यांचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध पर्यावरणवादी शुभाजित मुखर्जी यांनी या प्रणाली विद्यालयासाठी तयार करून दिल्या असून, त्यांचे उद्घाटन आमदार योगेश सागर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला नगरसेवक दीपक तावडे, नगरसेविका दक्षता कवठनकर, मनोज चव्हाण, संस्थेचे सदस्य प्रशांत पाटील, संगीता पाटील, मदनराव चव्हाण, अश्विनी फडतरे, माजी विद्यार्थी संघटना सदस्य तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.