भिवंडी महापालिका अर्थसंकल्पावर साडेसहा तास चर्चा

भिवंडी महापालिका अर्थसंकल्पावर साडेसहा तास चर्चा
Published on

भिवंडी महापालिका अर्थसंकल्पावर साडेसहा तास चर्चा
अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही
भिवंडी, ता. ३१ (वार्ताहर) : शहराला बकाल करणाऱ्या अनधिकृत बांधकामांना लगाम घातलाच पाहिजे. यापुढे बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या आणि चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट घरी बसवू, असा इशारा महापौर नारायण चौधरी यांनी दिला आहे. सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष महासभेच्या समारोपानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सकाळी ११:३०ला सुरू झालेली महासभा सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालली. सुमारे साडेसहा तास चाललेल्या या सभेत ११७९ कोटींच्या अर्थसंकल्पावर सविस्तर खल झाला. सदस्यांनी मालमत्ता कर, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या नागरी समस्यांवर प्रशासनाचा पाढा वाचला. गेल्या तीन वर्षांपासून शहरात प्रशासकीय राजवट असल्याने कोणाचाही दबाव नव्हता, मात्र आता लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आल्याने प्रशासनावर वचक राहील, असे महापौरांनी स्पष्ट केले.
आयुक्त अनमोल सागर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला सभागृहाने सहमती दर्शविली आहे. शहर विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र काम करतील. शहरात वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करीत नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या घटकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत महापौरांनी दिले.

खरा पिक्चर बाकी आहे!
अनधिकृत बांधकामांबाबत बोलताना महापौर कमालीचे आक्रमक दिसले. विनापरवाना कशाही इमारती उभ्या राहिल्याने शहराचे स्वरूप बिघडले आहे. मी पदभार स्वीकारून केवळ एक महिना झाला आहे; आता खरा पिक्चर दाखवणे बाकी आहे, असे सांगत त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com