

दोन वर्षांच्या संघर्षाला यश
ससुनवघर डोंगरीतील ५९ कुटुंबांना घरपट्टीचे वाटप
विरार, ता. ३१ (बातमीदार)ः वसई-विरार परिसरातील ससुनवघर डोंगरीतील ५९ कुटुंबांना घरपट्टीचा प्रश्न दोन वर्षांपासून रखडलेला होता. श्रमजीवी संघटनेच्या गाव कमिटीने दोन वर्षांपासून यासाठी विविध पातळीवर पाठपुरावा केला होता. त्या लढ्याला अखेर यश आले असून, हक्काच्या घरासाठी कायदेशीर पुराव्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ससुनवघर डोंगरी येथील ५९ कुटुंबांनी वनजमीन, शेतघर, घराखालील जमिनीला घरपट्टी लागावी, यासाठी १३ मार्च २०२४ रोजी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले होते. मात्र, तांत्रिक अडचणी तसेच प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. या विषयाचे गांभीर्य ओळखून श्रमजीवी संघटनेकडून प्रशासनाशी सतत संवाद साधला जात होता. याच अनुषंगाने मंगळवारी वसई-विरार शहर महापालिकेच्या वालीव ‘जी’ चिंचोटी कार्यालयात सर्व ५९ अर्जदारांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत घरपट्टी कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. दोन वर्षांच्या संयमानंतर हाती कागदपत्रे पडताच अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. या वेळी वसई ग्रामीण तालुका महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, गाव कमिटी अध्यक्ष तृप्ती रावते, उपाध्यक्ष सिताराम हावरे, सचिव दर्शन भोये, युवा प्रमुख जयेश वाघ यांच्यासह संघटनेचे सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------
हा विजय ५९ कुटुंबांबरोबर संघटनेच्या एकजुटीचा आहे. वंचिताला सामान्य माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.
- लक्ष्मी वाघ, तालुकाप्रमुख, वसई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.