

नवोदित खेळाडूंना आर्थिक पाठबळ
वसई-विरार महापालिकेची क्रीडा दत्तक योजना
वसई, ता. ३१ (बातमीदार)ः वसई-विरार शहरात उदयोन्मुख खेळाडू, क्रीडा संघांना प्रोत्साहन देत क्रीडा संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शहर क्रीडा दत्तक योजना मिशन राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.
मोबाईलच्या गराड्यात अडकलेल्या युवक समाजमाध्यमांवर रिल्स, चित्रीकरण किंवा चॅटिंग, व्हिडिओ पाहण्यात व्यग्र झाला आहे. त्यामुळे अशा मुलांना मैदानी खेळांसह अन्य खेळांमध्ये नेपुण्य मिळवण्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने शहरात क्रिकेट, बॉक्सिंग, कबड्डी, खो-खो, हॉकी, टेनिस, मॅरेथॉन, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग, हॅन्ड बॉल, बॅडमिंटन, अथलेटिक्स, कुस्ती, रायफल शूटिंग, तायक्वांदोसह विविध खेळातील खेळाडूंना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी क्रीडा दत्तक योजना राबवली आहे. या योजनेमुळे खेळाडूंना सराव, साधन सामग्री उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे वसईतील खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
-----------
योजनेचे फायदे
निवड प्रक्रियेद्वारे पात्र खेळाडू
आवश्यक क्रीडा साहित्य
स्पर्धांमध्ये सहभागासाठी आर्थिक सहाय्य
साधन, सुविधा उपलब्धता
-------------
वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून कला-क्रीडा खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केला जातो. महापालिकेच्या माध्यमातून शहर क्रीडा दत्तक योजना विचाराधीन आहे.
-अजीव पाटील, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.