मटाराचा भाव वाढला; आवक घटल्याने बाजारात दर तेजीत

मटाराचा भाव वाढला; आवक घटल्याने बाजारात दर तेजीत
Published on

मटाराचा भाव वाढला
आवक घटल्याने बाजारात भाव तेजीत
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मटारच्या आवकमध्ये घट झाल्याने भाव वाढले आहेत. मुख्य हंगाम संपल्यामुळे स्थानिक पातळीवरील पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम भावांवर दिसून येत आहे. यामुळे किरकोळ बाजारात मटार १०० रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे.
मटारला मुंबईत घरगुती वापरासोबतच हॉटेल व्यावसायिकांकडूनही मोठी मागणी असते. विशेषतः हिवाळा आणि पावसाळा या कालावधीत मटारचा मुख्य हंगाम असल्याने दररोज ४० ते ५० मटाराच्या गाड्या वाशीच्या घाऊक बाजारात दाखल होत होत्या. मात्र, हंगाम संपल्याने ही आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, आता केवळ आठ ते १० गाड्यांचीच आवक होत आहे. त्यामुळे उपलब्धता कमी झाली तरी मागणी कायम असल्याने भाव वाढले आहेत. सध्या घाऊक बाजारात हिरवा मटार ५० ते ६० रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात हा भाव १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढत्या भावाचा फटका बसत आहे.

परराज्यांवर अवलंबित्व
स्थानिक उत्पादन कमी झाल्याने आता दिल्ली आणि हिमाचल प्रदेश येथून काही प्रमाणात हिरव्या मटारची आवक होत आहे. मात्र, परराज्यातून येणाऱ्या मालाचा वाहतूक खर्च अधिक असल्याने त्याचाही परिणाम भाववाढीवर होत आहे. एकूणच, परराज्यांवर अवलंबित्व वाढल्याने बाजारात भाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी सध्या मटार खरेदी करताना वाढीव भावांचा विचार करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com