वेतन, भत्ते महापौर निधीसाठी समर्पित

वेतन, भत्ते महापौर निधीसाठी समर्पित
Published on

वेतन, भत्ते महापौर निधीसाठी समर्पित
नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय
मालाड, ता. ३१ (बातमीदार) : जनहितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळातील वेतन व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित करण्याची घोषणा केली आहे.
महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४७ मधून विजयी झालेले तिवाना हे स्थायी व विधी समितीचे सदस्य आहेत. पुढील पाच वर्षांत मिळणारे संपूर्ण मानधन तसेच विविध समित्यांच्या बैठकींसाठी मिळणारे भत्ते महापौर निधीत जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यासंदर्भात महापौरांना निवेदनही सादर केले आहे.
नगरसेवक म्हणजे जो नगराची सेवा करतो आणि ती सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. जनसेवा हा माझ्यासाठी संकल्प असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच माझे कर्तव्य आहे, असे तिवाना यांनी सांगितले.
महापौर निधीत जमा होणारी ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी तसेच विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांना संधी देत नव्या ऊर्जेसह सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिवाना यांचा हा निर्णय त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com