उल्हासनगरात पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट

उल्हासनगरात पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट
Published on

उल्हासनगर, ता. ३१ (बातमीदार) : पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे उल्हासनगर शहरात पेट्रोलचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः हिराघाट परिसरात दुचाकींमधून पेट्रोल काढण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिराघाट परिसरात उभ्या असलेल्या दुचाकींमधून चोरट्यांकडून पेट्रोल काढून नेले जात आहे. काही वाहनधारकांना सकाळी गाडी सुरू करताना पेट्रोल संपल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यामध्ये काही संशयित व्यक्ती दुचाकींच्या टाक्यांमधून पेट्रोल काढताना दिसत आहेत. पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com