

आई भगवतीचा आजपासून जागर
केळवेतील शीतलादेवीच्या यात्रेला सुरुवात
पालघर, ता. ३१ (बातमीदार)ः केळवेतील शीतलादेवीचे मंदिर जागृत देवस्थान आहे. या देवीला आई भगवतीचे रूप मानले जाते. त्यामुळेच केळवेतील शीतलादेवीचा महिमा राजस्थान-मारवाड, पंजाब-हरियाना, हरिद्वार, विद्यांचलपासून अगदी कराचीपर्यंत पोहोचला आहे.
केळवे गावाची ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील लोकांची कुलस्वामिनी असलेली आदिशक्ती शीतलामाता प्राचीन काळापासून विराजमान आहे. महामारी, साथीच्या रोगांपासून संरक्षण करणारी ही देवता लोकांच्या विश्वासाचे केंद्र मानली जाते. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी, भक्तांच्या हाकेला धाऊन जाणारी, भक्तांना भरभरून देणारी माता असा तिचा नावलौकिक आहे. आजच्या घडीला शीतलादेवी, सिद्धिविनायक, वाळुकेश्वर महादेव तिन्ही स्वयंभू, जागृत देवतांचे स्थान मंदिरात आहे. साक्षात श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत प्रभू श्रीरामचंद्रानी दिव्य शक्तीने निर्माण केलेल्या रामकुंडातील पाण्याने वलुकेश्र्वराला अभिषेक करून पुढील मार्गक्रमण केले. त्यामुळे दूरदूरचे भाविक येथे स्नानासाठी येतात.
------------------------------
सामाजिक उपक्रमात अग्रेसर
चैत्र पौर्णिमेला देवीची मुख्ययात्रा भरते. नवरात्रोत्सवात धार्मिक तसेच त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, वर्षभरातील उत्सव विश्वस्त मंडळ साजरे करते. मंदिर परिसरातील शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छतेमुळे प्रसन्नतेची अनुभूती अनुभवायला मिळते.
मंदिरास तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. सामाजिक कार्यातही शीतलादेवी देवस्थान ट्रस्टने सातत्याने योगदान दिले आहे. याशिवाय विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून गरजून्ना शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, असे विविध सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.