भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी

भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी
Published on

माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभुदास भोईर
कामगार चळवळीला नवे बळ मिळण्याची शक्यता
पनवेल, ता.३१ (बातमीदार) : अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना तसेच अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने प्रभुदास भोईर यांची अनुक्रमे रायगड जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र (नवी मुंबई) सचिव या महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या निवडीमुळे कामगार चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. या पत्रात भोईर यांच्यावर कामगारांचे प्रतिनिधित्व करण्याबरोबरच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भोईर यांच्या नियुक्तीमुळे विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कामगारांच्या समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com