

अंजुमन इस्लाम येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा
मुरूड, ता. ३१ (बातमीदार) : अंजुमन इस्लाम जंजिरा-मुरुडच्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला ५० वर्षे तर कला शाखेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेतर्फे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
मुरूड नगरपरिषद नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष वीरेंद्र भगत, अंजुमन इस्लाम संस्थेचे सह सचिव अब्दुल रहिम कबले, खजिनदार अल्ताफ मलिक, अंजुमन आय. टी. आय. चेअरमन समीर दौनाक, सदस्य तौसीफ फत्ते, नगरसेवक मनीष विरकुड, प्रिता चौलकर, प्रांजली मकू, प्रमिला माळी, मुख्याध्यापक वसीम सातारेकर, पर्यवेक्षक इष्टियाक आरिफ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी क्रिकेट स्पर्धेमध्ये मुरूड अंजुमन इस्लाम हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक अंजुमन श्रीवर्धन यांनी मिळवला आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस अंजुमन गोंडघर यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंलालन सहीदा कारभारी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.