सरळ सेवा भरतीअंतर्गत १३ आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र प्रदान

सरळ सेवा भरतीअंतर्गत १३ आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र प्रदान
Published on

सरळ सेवा भरतीअंतर्गत १३ आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र प्रदान
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) : सरळ सेवा भरती २०२३-२४ अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सेवक पदासाठी निवड झालेल्या १३ उमेदवारांना सोमवारी (ता. ३०) नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर उपस्थित होत्या.
या भरती प्रक्रियेत आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के संवर्गातून ७ आणि ५० टक्के संवर्गातून ६ अशा एकूण १३ उमेदवारांची अतिरिक्त निवड सूचीमधून निवड करण्यात आली. यामध्ये ४० टक्के संवर्गातून वैभव डोंगरे यांना उपकेंद्र मजगाव-माणगाव, श्रीकृष्णा वाईकर यांना उपकेंद्र हमरापूर-पेण, विनय कदम यांना उपकेंद्र वेळास-श्रीवर्धन, प्रशांत दुधमल यांना उपकेंद्र वेळास-श्रीवर्धन, सागर वेहेळे यांना उपकेंद्र चैक-खालापूर, अनंता वायाळ उपकेंद्र निजामपूर-महाड, अजयसिंह सावंत भोसले यांना उपकेंद्र दासगांव-महाड येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर ५० टक्के संवर्गातून साकिब पटेल यांना उपकेंद्र आचळोली-महाड, किरण किर्तने यांना उपकेंद्र मोठे शहापूर-अलिबाग, जगदिश सुलाने यांना उपकेंद्र खारआंबोली-मुरूड, प्रकाश शिंदे यांना उपकेंद्र मांघरुण-महाड, अमोल जाधव यांना उपकेंद्र नेवरुळ-म्हसळा, राजेंद्र जोनवाल यांना उपकेंद्र वेळास-श्रीवर्धन येथे नियुक्त करण्यात आले आहे.
यावेळी उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com