६ हजार ९१३ निरक्षरांचे साक्षरतेकडे पाऊल

६ हजार ९१३ निरक्षरांचे साक्षरतेकडे पाऊल
Published on

सहा हजार ९१३ निरक्षरांचे साक्षरतेकडे पाऊल
‘उल्लास कार्यक्रम’अंतर्गत जिल्ह्यात उपक्रम
पालघर, ता. ३१ ः सर्वांगीण साक्षरता साध्य करण्याच्या उद्देशाने ‘उल्लास’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १,४८६ परीक्षा केंद्रांवर रविवारी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान चाचणी परीक्षा घेण्यात आली. या उपक्रमात सहा हजार ९१३ नवसाक्षरांनी साक्षरतेच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे.
केंद्रशासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२-२३ ते २०२६-२७ कालावधीत केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन), संख्याज्ञान विकसित करणे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. परीक्षेकरिता जिल्ह्यातील ७,१५३ पात्र नवसाक्षरची नोंदणी केली. त्यापैकी सहा हजार ९१३ परीक्षार्थी परीक्षेला बसले. त्यात पाच हजार ३२ महिला आणि एक हजार ८८१ पुरुषांनी ही परीक्षा दिली, तर डहाणू येथील एक आणि पालघर तालुक्यातील दोन अशा एकूण तीन अपंग परीक्षार्थींनीही मोठ्या जिद्दीने सहभाग घेतला. या वेळी अंगठा बहाद्दर ही ओळख पुसली जाईल, याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला.
-----------------------
आजी-आजोबांची लक्षवेधक उपस्थिती
- परीक्षेदरम्यान अक्षर ओळख, चित्र जोडा, साधी गणिती आकडेमोड अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते. १५० गुणांच्या या चाचणीत वाचन, लेखन, संख्याज्ञान या तिन्ही विषयांत प्रत्येकी ५० गुण ठेवण्यात आले असून, उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात १७ गुण आवश्यक आहेत.
- जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांमध्ये या परीक्षेमुळे आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धातही शिक्षणाची ओढ कायम असलेल्या अनेक आजी-आजोबांनी या परीक्षेत हजेरी लावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
--------------------------------------
परीक्षेचे चोख नियोजन
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनात विभागाने परीक्षेचे चोख नियोजन केले होते. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्वयंसेवकांनी गावोगावी सर्व्हे करून निरक्षर व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मेहनत घेतली. या अभियानाच्या माध्यमातून पालघर जिल्हा साक्षर होण्यासाठी मदत झाल्याचे शिक्षण विभागातील योजना शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com