मुरूडमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात

मुरूडमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात
Published on

मुरूडमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात
पालखी मिरवणूक, भजन-कीर्तनातून भक्तीमय वातावरण
मुरूड, ता. ३१ (बातमीदार) : अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक मुरुड येथील जैन समाजाने मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला. शहरातील भगवान महावीर मंदिर आकर्षक रोषणाई, रंगोळी आणि पुष्पमालांनी सजवण्यात आले होते, त्यामुळे मंदिर परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
या निमित्ताने मुरुड जैन समाजातर्फे पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सुवर्ण रथामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करून बाजारपेठ मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, बालगोपाल, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावीर भगवान की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन समाजाचे अध्यक्ष हसमुख जैन, अशोक जैन, छगनलाल जैन, गौतम जैन तसेच सल्लागार समितीतील ललित जैन, रमेश जैन, ताराचंद जैन, नरेंद्र जैन यांनी पुढाकार घेतला. युवक मंडळ आणि महिला मंडळानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
सकाळी मंदिरात अभिषेक व पूजन विधी पार पडले, तर सायंकाळी आरतीनंतर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जैन समाजातील तरुण मंडळी व महिला मंडळाने सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com