

सरळगाव, ता. ३१ (बातमीदार) : भुवन येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली आहे. ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेनुसार यावर्षी ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत साडेतीन दिवसीय सप्ताह घेण्यात आला. सप्ताहादरम्यान तालुक्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा भाविकांना लाभणार आहे. यामध्ये ह.भ.प. धनंजयदास महाराज (तुंगेश्वर मठ), ह.भ.प. अर्जुन महाराज सरजिने (कल्याण), ह.भ.प. छगन महाराज शेळके यांची कीर्तने होणार असून ३ एप्रिलला सकाळी ह.भ.प. राजाराम महाराज घावट यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. विशेष म्हणजे दररोज कीर्तन श्रवणासाठी येणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे पैठणी, तर पुरुषांसाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढला आहे. भुवन गावाला समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभला असून, ३६ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही भक्तीची परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे. या साडेतीन दिवसांत संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचा आणि श्रवणसुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुवन-भुवनपाडा ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.