

वसई विरार महापालिकेच्या
आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी.
विरार, ता. ३१ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पृथ्वीराज बी. पी. यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते २०१४च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. प्रशासकीय वर्तुळात ते एक शिस्तप्रिय आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांनी डिसेंबर २०२० ते जुलै २०२३ या काळात लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील जलसंधारण, शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला होता. विशेषतः कोरोना काळानंतर जिल्ह्याची विस्कळित झालेली घडी पुन्हा बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ते जुलै २०२३मध्ये महाराष्ट्र शासनाने केलेल्या मोठ्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्यांची नियुक्ती नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी सेवा अधिक सक्षम करण्याचे काम त्यांनी या पदावर असताना पाहिले.
याआधी त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण विकास, स्वच्छता मोहिमा आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते. पृथ्वीराज बी. पी. यांना जिल्हा प्रशासन, ग्रामीण विकास आणि शहरी पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील कामाचा दांडगा अनुभव आहे. सध्या ते राज्य प्रशासनातील एका जबाबदार पदावर कार्यरत असून, त्यांच्याकडे क्लिष्ट प्रकल्प मार्गी लावण्याचे कसब असल्याचे मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.