रील स्टार’ सुरेंद्र पाटील पुन्हा अटकेत

रील स्टार’ सुरेंद्र पाटील पुन्हा अटकेत
Published on

रील स्टार सुरेंद्र पाटील पुन्हा अटकेत
डोंबिवलीतील घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : समाजमाध्यमावर गँगस्टर स्टाइल व्हिडिओमुळे चर्चेत आलेले रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) यांना ठाणे गुन्हे शाखेने पुन्हा अटक केली आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरातील त्यांच्या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान घरातील शू रॅकमध्ये लपवून ठेवलेला एक गुप्त कप्पा आढळला. त्या कप्प्यातून सात बंदुका, ३७१ जिवंत काडतुसे आणि १६७ एअर गनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय तलवारी, चाकू, कोयते यांसारखी धारदार शस्त्रेही पोलिसांच्या हाती लागली. या सर्व शस्त्रांची अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या बंदुकांमध्ये पाच देशी पिस्तुले आणि रिव्हॉल्व्हरचा समावेश असून, काही शस्त्रांवर ‘मेड इन यूएसए’ आणि ‘स्पेशल ऑटो’ अशी नोंद आढळली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण शस्त्रसाठा वापरासाठी सज्ज अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुरेंद्र पाटील हे व्यवसायाने बिल्डर असून, त्यांच्या विरोधात यापूर्वी बलात्कारासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच ते एका प्रकरणात जामिनावर बाहेर आले होते. अल्पावधीतच पुन्हा अटकेमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मोठ्या रॅकेटचा संबंध आहे का?
पाटील यांचे इन्स्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक अनुयायी असून, ते या शस्त्रांचा वापर केवळ व्हिडिओंसाठी ‘प्रॉप्स’ म्हणून करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांनी हा दावा फेटाळला नसून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रसाठा नेमका कुठून आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि यामध्ये मोठ्या रॅकेटचा संबंध आहे का, याचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com