

चाणजे-उरण परिसरात स्वच्छता अभियान
संत निरंकारी मंडळाचा पुढाकार
उरण, ता. ३१ (बातमीदार) : ग्रामपंचायत चाणजे आणि संत निरंकारी मंडळ उरण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने उरण चारफाटा ते मुळेखंड फाटा या परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत निरंकारी मंडळाच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात मोठ्या प्रमाणात कचरा साफसफाई करण्यात आली असून, परिसर स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे. त्यामुळे रोगराईवर आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
या वेळी ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे यांनी संत निरंकारी मंडळ केवळ आध्यात्मिक कार्यापुरते मर्यादित नसून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. तसेच तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करून वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवण्याचे कार्यही मंडळ करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
निरंकारी मिशनचे मुखी समीर पाटील यांनी उपस्थितांना मिशनची पुस्तके वाटप केली. या अभियानात रुपाली कोळी, रोशन मेश्राम, विकास शर्मा, संजय पारदे, कैलाश नाखवा, संजीवन रावळे यांच्यासह निरंकारी सेवादलाचे सदस्य, करंजा येथील ज्येष्ठ नागरिक मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.