केळीचे एक हजार कंटेनर इराणमध्ये अडकले; शेतकरी उद्ध्वस्त

केळीचे एक हजार कंटेनर इराणमध्ये अडकले; शेतकरी उद्ध्वस्त
Published on

केळीचे एक हजार कंटेनर इराणमध्ये अडकले
आखाती युद्धाचा उत्पादकांना मोठा फटका; शेतकरी हवालदिल
जुईनगर, ता. ३१ (बातमीदार) : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. जेएनपीए बंदरातून इराणला पाठवलेले सुमारे ८०० ते १,००० केळीचे कंटेनर तेथेच अडकून पडले असून, शिपिंग कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ भाडेवाढीमुळे निर्यातदार आणि शेतकरी संकटात सापडले आहेत.
युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ देशांकडे जाणारे १,२०० ते १,५०० कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले होते. सुमारे १५ दिवसांनी यातील काही कंटेनर इराणकडे पाठवण्यात आले, तर काही स्थानिक बाजारात विक्रीसाठी वळवण्यात आले. इराणमध्ये कंटेनर पोहोचल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी युद्धाचा आधार घेत भाड्यात मोठी वाढ केली. आधी दोन ते तीन लाख असलेले भाडे थेट १५ लाखांपर्यंत नेण्यात आले. त्यातच इराणमध्ये पोहोचलेले जवळपास एक हजार कंटेनर शिपिंग कंपन्यांनी अडवून ठेवल्याने केळी खराब होऊ लागली आहेत. एकीकडे वाढलेले भाडे आणि दुसरीकडे खराब होणारा माल यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोलापूरमधील ५० ते ६० शेतकऱ्यांनी शिपिंग कंपन्यांना जाब विचारला. दरम्यान, काही कंपन्यांनी पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

निर्यात ठप्प ः दर घसरले
केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून, व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. निर्यात बंद झाल्यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीला फक्त ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगण्यात येत आहे. निर्यात बंद झाल्यामुळे आखाती युद्धाचा परिणाम इतर पिकांवरही झाल्याचे दिसून येत आहे.


जगातील एक नंबर असलेल्या फिलिपाइन्स देशाने केळी उत्पादन बंद केल्याने भारतीय केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. मात्र आखाती युद्धाने सध्या शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी २० ते २२ रुपये प्रतिकिलो असणारी केळी सध्या सहा ते आठ रुपये प्रतिकिलो खरेदी होत असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही.
- दीपक कोकणे, केळी उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com