

आनंद स्वरूप यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा
कोपरखैरणेत कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारे आणि जातिवाचक शिवीगाळ करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी धार्मिक गुरू स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत कोपरखैरणे येथील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
आनंद स्वरूप यांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्यासंदर्भात बोलताना महार जातीचा शूद्र असा अवमानकारक उल्लेख केला. तसेच त्यांनी केलेल्या विधानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारे आणि जातिवाचक शिवीगाळ करणारे वक्तव्य करणाऱ्या आनंद स्वरूप याच्याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी केली. मात्र पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे सचिन कटारे, ॲड. स्वप्नील जगताप, ॲड. अमोल उघाडे, ॲड. शैलेश लाटकर, ॲड. सौरव मोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप, मल्लिनाथ सोनकांबळे, राजेश भालेराव, लक्ष्मण गोडसे, मयूर भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे रवींद्र सदाफुले, मल्हारी शिंदे, भीम आर्मीचे प्रकाश पाईकराव या विविध पक्ष व संघटनांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कोपरखैरणे येथील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रबाळे पोलिस ठाण्यात आनंद स्वरूप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.