

नगरसेवक भरत भोईर यांना
न्यायालयाचा दिलासा
अपात्रतेचा तो अंतरिम आदेश रद्द
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रभाग क्र. १४ ‘ड’चे अपक्ष नगरसेवक भरत कृष्णा भोईर यांना बेलापूर दिवाणी न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भोईर यांना कामकाजापासून रोखणारा २५ मार्च २०२६चा अंतरिम स्थगिती आदेश न्यायालयाने आता पूर्णपणे रद्द केला आहे. यामुळे भोईर यांचा नगरसेवक म्हणून सर्व प्रकारच्या धोरणात्मक किंवा प्रशासकीय कामकाजात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सविता देवीदास लगडे यांनी भरत भोईर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. भोईर यांना तीन अपत्ये असून, तिसऱ्या अपत्याचा जन्म १२ सप्टेंबर २००१ या कट-ऑफ तारखेनंतर झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने २५ मार्चला भोईर यांना धोरणात्मक किंवा प्रशासकीय निर्णय घेण्यापासून रोखणारे आदेश दिले होते. मात्र भरत भोईर यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर प्रतिवाद करताना न्यायालयात अनेक महत्त्वाचे पुरावे सादर केले. भरत भोईर यांचे तिसरे अपत्य अंकित याचा जन्म १० मे २००१ मध्ये झाला असून, तो शासन निर्णयातील कट-ऑफ तारखेच्या आधीचा असल्याचे निदर्शनास आणून दिले.
दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) के. एन. फटांगरे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि नवी मुंबई महापालिकेचा जन्मनोंदणी उतारा आणि शाळा सोडल्याचा दाखला यांची दखल घेतली. तसेच भरत भोईर यांनी सादर केलेले पुरावे विचारात घेत त्यांना कामकाजापासून रोखणारा २५ मार्चचा आदेश रद्द करण्यात येत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.