

राजस्थान महोत्सवात सांस्कृतीचे दर्शन
वेदान्त खुल्या रंगमंचाचे नूतनीकरण होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे, ता. ३१ (बातमीदार) : ठाणे पश्चिम येथे राजस्थानी समाजातर्फे वेदान्त खुल्या रंगमंचावर राजस्थान महोत्सव उत्साहात पार पडला. राजपुतांना संस्थानांचे एकत्रीकरण होऊन ३० मार्च या दिवशी राजस्थान राज्याची स्थापना झाली आणि त्याच दिवशी राजस्थान दिवस साजरा केला जातो. यंदा हा दिवस हिंदू नववर्षाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेसोबत साजरा करण्याचा आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात राजस्थानमधील सुप्रसिद्ध लोकगायक आणि लोकनृत्य कलाकार यांनी कला सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राजस्थानी समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत घूमर नृत्य सादर केले. प्रेक्षकांसाठी हे विशेष आकर्षण ठरले. दरम्यान, राजस्थानी संस्कृती, पारंपरिक राजस्थानी पेहराव आणि खाद्य पदार्थांच्या रेलचेलीमुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भामाशाहांना ‘राजस्थान गौरव’ व ‘राजस्थान विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला दिया कुमारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निरंजन डावखरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेविका अनिता यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थान महोत्सव आयोजन समितीचे मुख्य संरक्षक राकेश मोदी, अरुण जोशी, विजयकुमार बसावतिया, चंद्रकुमार जाजोदिया, महेश जोशी, महावीर शर्मा, प्रदीप गोएंका, सुरेंद्र समा, उदय परमार, अशोक पारेख, लक्ष्मीकांत मुंदडा, कपूर रामावत, विमल हिरेन, विटिका जैन, इंद्रा वैष्णव तसेच सर्व पुरुष व महिला कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत घेतली.
-----------------
हा राजस्थानी महोत्सव प्रामुख्याने राजस्थानी व्यंजन (खाद्यपदार्थ), सुप्रसिद्ध गायकांचे सादरीकरण, पारंपरिक घूमर नृत्य आणि तलवार नृत्य यामुळे वेदान्त ग्राउंड येथे राजस्थानी सांस्कृतिक रंगात रंगून गेला. तसेच यानिमित्ताने शूरवीरांच्या पराक्रमाची गाथाही सादर करण्यात आली. समाजातील सर्व घटकांना (३६ कौम) एकत्र आणण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जात असून, ज्या राजस्थानी व्यक्तींचा जन्म राजस्थानमध्ये झाला परंतु त्यांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानले, अशा मान्यवरांना ‘राजस्थान विभूषण’ आणि ‘राजस्थान गौरव’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याचे कपूर रामावत यांनी सांगितले.
राजस्थानी महोत्सवात राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम राबवण्यात आले, ज्यात प्रामुख्याने राजस्थानी व्यंजन (खाद्यपदार्थ), सुप्रसिद्ध गायकांचे सादरीकरण, पारंपरिक घूमर नृत्य आणि तलवार नृत्य यांचा समावेश होता. यानिमित्ताने शूरवीरांच्या पराक्रमाची गाथाही सादर करण्यात आली. तसेच ठाण्यात एक राजस्थान भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला, जेथून समाजातील गरजू आणि असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य केले जाईल, असे मुख्य संरक्षक राकेश मोदी म्हणाले.
-------
ठाण्यात राजस्थानी समाजासाठी नव्या सुविधांची घोषणा
१९९७मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याची आणि १९९९मध्ये या खुल्या रंगमंचाचे उद्घाटन केल्याची आठवण या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे बाजूच्या जागेत अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन पुढच्या वर्षापर्यंत १,०००-१,२०० लोकांसाठी अतिरिक्त बसण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वेळी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.