

खूनप्रकरणी दोघांना अटक
पेल्हार पोलिसांची कारवाई; आर्थिक वादातून हत्या
नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार) ः शिर नसलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेह प्रकरणाचा पेल्हार पोलिसांनी १२ तासांत उलगडा केला आहे. आर्थिक वादातून हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी शरीरापासून शिर वेगळे करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पेल्हार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. यात दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३१) त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत आरोपीना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अशोकसिंग करमसिंग राजपूत (३२) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे; तर दिनेशकुमार काणाराम प्रजापती (२७) आणि संदीप ब्रह्मदेव तिवारी (३५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील जाबरपाडा येथे मृत अशोकसिंग आणि आरोपी दिनेशकुमार यांनी आठ महिन्यांपूर्वी भैरवनाथ किराणा दुकान भागीदारीमध्ये सुरू केले होते. दुकानातील आर्थिक वादातून यांच्यात विवाद सुरू होता. याच वादातून मुख्य आरोपी दिनेशकुमार याने आपल्या मित्राच्या मदतीने किराणा दुकानातच धारदार हत्याराने गळ्यावर वार करून त्याचे शिर वेगळे केले. शरीर एकीकेड आणि शिर वैतरणा खाडीत फेकून आरोपी फरार झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.