

कुंर्झे गावात हरिनामाचा गजर
विक्रमगड (बातमीदार) ः तालुक्यातील कुंर्झे येथे सार्वजनिक हनुमान जयंती उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सोहळा व ग्रंथराज ३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यान हनुमान मंदिर जीर्णोद्धार, हनुमान जन्मोत्सव, शिवलिंग, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची भव्य मिरवणूक सोहळा होणार आहे. कुंर्झेतील सार्वजनिक हनुमान जयंती उत्सवात हभप पुंडलिक महाराज पिंपळके, हभप पंडित महाराज कोल्हे, हभप माधुरी शेलार यांचे कीर्तन होणार असून महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहेत. तर हनुमान जन्मोत्सव, शिवलिंग, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची भव्य मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडणार आहे. तर उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी फड रंगणार आहे.