

भाजप नगरसेवकांना महापौरांची तंबी
सभागृहात पक्षाचे बिल्ले लावल्यास प्रवेशबंदी
विरार, ता. १ (बातमीदार) ः पक्षाचे चिन्ह लावून सभागृहात येणाऱ्यांना वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वसई-विरार पालिकेतील हौशी नगरसेवकांना चाप बसणार आहे.
वसई-विरार महापालिकेत भाजपचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक पालिकेत येताना कमळ निशाणी असलेले बिल्ले लावून येतात. सोमवारी झालेल्या महासभेत एका भाजप नगरसेवकाने वर्तमानपत्राचे कात्रण फडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला महापौर अजीव पाटील यांनी आक्षेप घेतला. या वेळी सर्व भाजप नगरसेवकांना सभागृहाचे नियम असतात. त्यानुसार राजकीय घोषणाबाजी, वृत्तपत्र फडकवणे, राजकीय पक्षांचे निशाण फडकावण्याबाबत महापौर अजीव पाटील यांनी माहिती दिली. तसेच कुणीही सदस्य कपड्यांवर राजकीय पक्षांचे बिल्ले लावू शकत नसल्याचे, महापौरांनी सांगितले. तसेच यापुढे बिल्ले लावून कुणी आल्यास त्याला सभागृहाबाहेर काढले जाईल, अशी महापौरांनी तंबी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.