वसई-विरार पालिकेत फेरबदल

वसई-विरार पालिकेत फेरबदल
Published on

वसई-विरार पालिकेत फेरबदल
पाच कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

विरार, ता. १ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी फेरबदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी नगररचना, बांधकाम विभागातील पाच कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी अंकीत मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शर्वरी वर्तक, ओमकार राऊत यांची नगररचना विभागातून मुख्यालयी बांधकाम विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. आचोळे, धानिव-पेल्हार प्रभाग समितीमध्ये कार्यरत असलेले शुभम अधिकारी प्रणय पाटील यांची मुख्यालय स्तरावर नगररचना विभागात बदली केली आहे. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित नगररचना विभागाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. तसेच सर्व संबंधित अभियंत्यांनी कोणत्याही सबबीशिवाय तत्काळ उपसंचालक, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नवीन ठिकाणी पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा विनापरवानगी रजेवर गेल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com