चारोटी-आशागड मार्ग बंद

चारोटी-आशागड मार्ग बंद
Published on

चारोटी-आशागड मार्ग बंद
अवजड वाहतुकीस प्रशासनाकडून निर्बंध
कासा, ता. १ (बातमीदार)ः डहाणू-जव्हार-मोखाडा राज्यमार्ग क्रमांक ३० वरील रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरणाच्या कामामुळे चारोटी ते आशागड यादरम्यान अवजड व्यावसायिक वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पालघरचे अपर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार ०/००० ते २५/३०० टप्प्यात रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. विशेषतः वळण रस्त्यांची उभारणी करून मुख्य मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी वाहतुकीत बदल करणे अत्यावश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या वाहतूक बदलास पालघर पोलिस अधीक्षक यांनीही हरकत नसल्याचा सकारात्मक अहवाल प्रशासनाने दिला आहे. यामुळे महामार्ग क्रमांक ४८ वरील चारोटी ते राज्यमार्ग क्रमांक ३० वरील आशागड गावापर्यंतचा मार्ग अवजड तसेच व्यावसायिक वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
--------------------------------------
पर्यायी मार्ग
- १ एप्रिल २०२६ पासून सकाळी ६.०० वाजल्यापासून ते ३० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना अमलात राहणार आहे. चारोटी येथून धुंदलवाडी-आंबेसरी मार्गे आशागड तसेच आशागड येथून आंबेसरी-धुंदलवाडी मार्गे महामार्ग क्रमांक ४८ असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
- पोलिस, महसूल विभाग, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांतील वाहने आणि संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी असलेली वाहने निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने संबंधित गावांमध्ये व्यापक जनजागृतीच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com