शहर विकास विभागाची झेप

शहर विकास विभागाची झेप
Published on

शहर विकास विभागाची झेप
उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण; ६५२ कोटींहून अधिक महसूल जमा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : सहा हजार कोटींवर अधिक अर्थसंकल्पाकडे झेप घेणाऱ्या ठाणे महापालिकेने उत्पन्नवाढीकडे आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्नांना पालिकेच्या शहर विकास विभागाचे बळ मिळाले असून, २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात उत्पन्नात तब्बल ६५२ कोटी ५८ लाखांची भर टाकली आहे. विशेष म्हणजे दिलेल्या ६५० कोटींच्या टार्गेटच्या तुलनेत दोन कोटींची जास्त ‘कमाई’ या विभागाने केली आहे. गेल्यावेळेच्या तुलनेतही ७० कोटींपेक्षा जास्तीचा हा महसूल आहे.

शहराच्या विकासाचे व्हिजन पालिकेच्या अर्थसंकल्पातून सादर होत असतो; मात्र ठाण्यात कोविड काळानंतर शहर विकास विभागामुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठण्यात यश येत आहे. वास्तविक पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत शहर विकास विभाग असल्याचे गेल्या तीन वर्षांपासून सिद्ध होत आहे. शहरात सुरू असलेले नवनवीन गृह प्रकल्प, अतिरिक्त एफएसआय प्रीमियम, मालमत्ता कर, बांधकाम कामगार कल्याणकर, अनामत रक्कम आणि शासनाचा हिस्सा या माध्यमातून यंदाही शहर विकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे.

महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेले उद्दिष्ट ६५० कोटी ६० लाख इतके होते. त्यानुसार वसुलीचे उद्दिष्ट ठेवत शहर विकास विभागाने ६५२.५८ कोटी पर्यंत मजल मारली आहे. २०२२ मध्ये शासनाने बांधकाम उद्योगाला ५० टक्के प्रीमियर सवलत दिल्यामुळे त्यावर्षी एक हजारहून अधिक महसूल जमा झाला होता. त्यामुळे २०२४-२५ मध्ये या विभागाला ५८२ कोटी १५ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. हे लक्ष्य गाठताना विभागाची दमछाक झाली होती. मात्र, तरीही लक्ष्य पूर्ण करून ५८२ कोटी ७२ लाख रुपये महसूल जमा करण्यात यश आले होते.

विकासाला गती मिळणार
बांधकाम क्षेत्रातील वाढ, एफएसआयचा वाढता वापर आणि करवसुलीतील काटेकोरपणा यामुळे महसूल वाढीस चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. या निधीमुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सेवा सुधारण्यास गती मिळणार असल्याचा विश्वास शहर विकास विभागाने व्यक्त केला आहे.

महसूल वसुलीचा लेखाजोखा
महसुलाचा प्रकार जमा रक्कम (अंदाजे)
शासन हिस्सा १८० कोटी २१ लाख
अतिरिक्त एफएसआय प्रीमियम १०९ कोटी ११ लाख
बांधकाम कामगार कल्याण कर ९६ कोटी ५७ लाख
मालमत्ता कर २७ कोटी ८५ लाख
अनामत रक्कम ८८ लाख ३७ हजार
एकूण निव्वळ वसुली ६५२ कोटी ५७ लाख ९४ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com